थेंबे थेंबे तळे साचे

thembe thembe talhe sache intro

“थेंबे थेंबे तळे साचे” – ही एक म्हण आपण सगळ्यांनी ऐकलीच आहे. पण ती फक्त म्हण नाही, ती जगण्याची पद्धत आहे.
प्रत्येक मोठी गोष्ट, प्रत्येक यश, प्रत्येक बदल – एका छोट्या थेंबापासूनच सुरू होतं.

पण आपल्या आयुष्यात काय होतं?
आपण मोठ्या स्वप्नांबद्दल बोलतो, पण पहिलं पाऊल टाकायला घाबरतो.
आपण म्हणतो, “एक दिवस नक्की करीन…” आणि तो दिवस कधीच येत नाही.हे पुस्तक त्या “एक दिवस” ला आजमध्ये बदलण्यासाठी आहे.
हे पुस्तक त्या “एक दिवस” ला आजमध्ये बदलण्यासाठी आहे.

हे पुस्तक कशाबद्दल आहे?

हे पुस्तक लहान गोष्टींवर आहे पण त्या लहान गोष्टींच्या मोठ्या अर्थांवर.
एक छोटं काम, एक चांगला विचार, एक वेळेवर दिलेला शब्द या सगळ्या गोष्टी मिळून आयुष्याचं तळं तयार करतात.
थेंब म्हणजे लहान कृती,
आणि तळं म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य.

प्रत्येक प्रकरणात तुम्हाला आयुष्यातील एक नवीन दृष्टिकोन समजेल कधी सवयींचं सामर्थ्य, कधी अपयशाचं सौंदर्य, कधी शब्दांची जादू, तर कधी मनाची शांतता.
प्रत्येक पान तुम्हाला थांबायला, विचार करायला आणि पुन्हा चालायला प्रेरित करेल.

लहान गोष्ट, मोठा अर्थ

कधी विचार केलात का
एखादं झाड हजारो पाने फुलवतं, पण त्याची सुरुवात फक्त एका छोट्या बियाण्यापासूनच होते.
तसंच, आयुष्याचं झाडही एका छोट्या निर्णयाने उगवतं.

थेंबे थेंबे जमत राहिले की तळं तयार होतं,
तसंच, लहान प्रयत्न जमत राहिले की यश तयार होतं.

हे पुस्तक तुम्हाला सांगेल,
मोठं होण्यासाठी मोठं काही करण्याची गरज नाही,
फक्त मनापासून आणि दररोज थोडं काहीतरी करायचं आहे.

हे पुस्तक का वाचावं?

कारण हे पुस्तक तुम्हाला “थांब” असं नाही सांगणार
हे पुस्तक तुम्हाला “पुढे चल” असं सांगेल.
हे तुम्हाला बदलायचं धैर्य देईल, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे,
हे पुस्तक तुम्हाला आठवण करून देईल की,

“मोठ्या यशाचा पाया लहान प्रयत्नांच्या विटांनी रचलेला असतो.”

लेखकाचा संदेश

मला नेहमी असं वाटतं – प्रेरणा कुठेतरी बाहेर नसते, ती आपल्या आत दडलेली असते.
फक्त तिला जागं करायचं असतं.
हे पुस्तक तुमच्यातल्या त्या शक्तीला, त्या आत्मविश्वासाला जागं करण्याचा प्रयत्न आहे.

हे पुस्तक तुम्हचं मित्र आहे – जे तुम्हाला सांगेल,

“थांबू नकोस… अजून थोडं चाल… अजून थेंब गाळ…”

थेंबे थेंबे तळे साचे – एक प्रवास

हे पुस्तक प्रवास आहे,
“लहान प्रयत्न” पासून “मोठ्या यशाकडे” जाणाऱ्या माणसाचा प्रवास.
प्रत्येक प्रकरण म्हणजे एक थेंब आणि शेवटी मिळून तयार होईल एक सुंदर, शांत, प्रेरणादायी तळं
तुमच्या आयुष्याचं.

“यश काही एका रात्रीचं नाही, ते अनेक लहान दिवसांच्या प्रयत्नांचं फळ आहे.”

पुढील अध्याय कथा १ : लहान सुरुवात, मोठं स्वप्न