प्रवास : तुझ्या माझ्या गोष्टी

pravas tujhya majhya goshti

कधी वाटलंय का, की आयुष्य म्हणजे फक्त दिवस मोजणं नाही, तर त्या दिवसांच्या मागे राहिलेलं “कोणीतरी” जपणं आहे?

ही गोष्ट आहे दोन व्यक्तींची – गोपाल आणि रुक्मिणी, ज्यांनी संसाराच्या चढ-उतारात प्रेमाची नवी व्याख्या लिहिली.
त्यांचा प्रवास लग्नाच्या शुभ कार्यापासून सुरू होतो, पण शेवट होतो एका शांत बाकावर… जिथं शब्द संपतात, पण प्रेम अजूनही बोलतं.

ही कथा हसवतेही आणि डोळेही पाणावते.
कधी हलक्याफुलक्या गमतींमध्ये तुम्हाला तुमचं घर सापडेल,
तर कधी त्यांच्या निःशब्द क्षणांत तुमचं स्वतःचं प्रतिबिंब.

गोपाल आणि रुक्मिणीचं आयुष्य साधं आहे – पण त्या साधेपणातच एक अद्भुत जादू आहे.
भांडणं, ताण, हास्य, आठवणी, आजारपण आणि शेवटी न संपणारं जिव्हाळ्याचं बंधन – या सगळ्यातून उमललेला आहे “प्रवास : तुझ्या माझ्या गोष्टी.”

ही फक्त प्रेमकथा नाही…
ही एक आठवण आहे, जी प्रत्येक घरात जगते.
ती आपल्याला सांगते

“खरं प्रेम कधी संपत नाही;
ते फक्त रूप बदलतं, पण साथ कधी सोडत नाही.”

पुढील अध्याय अध्याय १ – लग्नाचा दिवस