“प्रत्येक सकाळ ही कालचं विसरून पुन्हा सुरू होण्याची संधी असते.”
आपण सगळेच कधी ना कधी भूतकाळात अडकलो आहोत.
एखादी चूक, अपयश, वाईट प्रसंग आणि मग आपण त्यातच अडकून पडतो.
पण आयुष्य असं नाही चालत.
कारण सूर्य रोज उगवतो आणि तो कालचा सूर्य नसतो.
“प्रत्येक दिवस हा एक नवीन पान असतो, ते जुनी गोष्ट पुढं न्यायला नाही, नवी गोष्ट लिहायला असतं.”
कथा: साक्षीचा नवा दिवस
साक्षी एक कलाकार होती.
तिचं चित्र एका मोठ्या प्रदर्शनात निवड झालं नव्हतं.
ती खचली. ती काही दिवस रडली, स्वतःवर रागवली.
एका दिवशी तिच्या छोट्या मुलीनं विचारलं,
“आई, तुझं ब्रश बंद का ठेवतेस? सूर्य तर रोज उगवतो ना?”
त्या एका वाक्यानं साक्षी जागी झाली.
ती म्हणाली “हो, माझं ब्रश पण उगवेल आता रोज.”
ती पुन्हा रंगवू लागली, रोज थोडं थोडं.
काही महिन्यांनी तिचं चित्र पुन्हा प्रदर्शनात गेलं आणि या वेळी, पहिल्या क्रमांकावर आलं.
ती म्हणाली
“काल हरले, पण आज जिंकले, कारण मी पुन्हा सुरू केलं.”
नवा दिवस म्हणजे नवा विचार
प्रत्येक दिवस नवा आहे, कारण तो तुमच्या हातात आहे.
काल काहीही झालं असलं, आज तुम्ही ठरवू शकता –
आज वेगळं करायचं.
तुमच्या भूतकाळाने तुमची कथा लिहिली असेल,
पण तुमचा वर्तमान तिला पुढं न्यायचा की बदलायचा, हे तुम्ही ठरवता.
“प्रत्येक सकाळ म्हणजे देवाने दिलेली दुसरी संधी – स्वतःला पुन्हा तयार करण्याची.”
आयुष्य म्हणजे पानं उलटत राहणारा प्रवास
जर एखादं पान काळवंडलेलं असेल,
तर त्यावर बसून राहू नका पुढचं पलटा.
कारण तिथं कदाचित तुजचा सर्वात सुंदर अध्याय लिहिला जाणार आहे.
कधी कधी फक्त थोडं चालणं, थोडं हसणं, थोडं माफ करणं – इतकं पुरेसं असतं नव्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी.
“प्रत्येक दिवस हा नव्याने जगण्याची संधी असते.”
“जे काल हरले, ते आज पुन्हा जिंकू शकतात – जर त्यांनी उठायचं ठरवलं तर.”
वाचकासाठी एक विचार
आज तुम्ही ठरवा
भूतकाळ विसरून, नवा दिवस सुरू करायचा.
काही नवीन शिकायचं, काही नवीन करायचं,
किंवा फक्त स्वतःला पुन्हा हसवायचं.
“प्रत्येक सूर्योदय तुम्हाला आठवण करून देतो – तुम्ही अजूनही बदलू शकता.”

