घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत,
ते अपेक्षांचं मुख्यालय असतं!
इथे प्रत्येकाला वाटतं – “माझं ऐकायला पाहिजे,”
आणि कोणी ऐकत नाही म्हणून सर्वांना वाटतं – “मला कोणी समजत नाही!”
होय, घरात सगळ्यांना प्रेम हवं असतं,
पण सर्वांना आपल्याच पद्धतीने हवं असतं.
आणि इथूनच सुरू होते सिरीयल – “अपेक्षांचं कुंडली भाग १!”
आई – अपेक्षांची CEO
आई म्हणजे एक अद्भुत व्यक्ती.
ती सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं सांभाळते,
पण तिची अपेक्षा फार छोटी असते
“सगळे वेळेवर खातील आणि थोडं कौतुक करतील.”
पण आपण काय करतो?
फोन हातात घेऊन म्हणतो – “आई, भाजी परत तीच का?”
आई काही बोलत नाही, पण मनात म्हणते
“थांब रे, ह्याचं जेवण एक दिवस मीच विसरेन!”
आईकडून अपेक्षा असते की ती सगळं समजून घ्यावी,
पण तिच्या भावना समजून घेण्याची वेळ कोणी घेत नाही.
तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे असते एक न बोललेलं “थोडं लक्ष दे ना”!
बाबा – घरचा silent investor
बाबा म्हणजे त्या मोबाइलच्या battery saver mode सारखे
कमी बोलतात, पण सगळं चालतं त्यांच्यामुळेच!
त्यांची अपेक्षा खूप simple
“घर चालावं नीट, सगळे आनंदात राहावेत.”
पण त्यांच्या प्रेमाचं ‘version update’ आपण घेतच नाही.
बाबा म्हणतात – “पैसे पुरतील ना?”
आपण म्हणतो – “तुम्ही नेहमी पैशांबद्दलच विचारता!”
पण खरं तर तो विचारतो – “तुम्ही नीट आहात ना?”
फक्त त्याच्या भाषेत.
त्याच्या अपेक्षा थोड्या मूक असतात,
पण त्या सगळ्यात मजबूत असतात.
मुलं – Generation “Why not?”
मुलांच्या अपेक्षा वेगळ्याच
“पालकांनी आपल्याला समजून घ्यावं,
आणि तरीही आपण उशिरा घरी आलो तरी काही बोलू नये!” 😂
त्यांना वाटतं – “आम्ही modern आहोत,
पालकांनी adjust करायला हवं.”
पण त्यांना कधी जाणवत नाही
पालकही modern झाले आहेत, फक्त ते अजून patience ठेवतात!
घरात generation gap म्हणजे विचारांचा clash नाही,
तर अपेक्षांच्या भाषांतराचा गोंधळ आहे.
सगळ्यांच्या अपेक्षा योग्य – फक्त direction चुकतं
घरात कोण बरोबर, कोण चुकतं हा प्रश्नच चुकीचा आहे.
सगळ्यांचं मन बरोबर असतं,
पण communication mismatch होतो.
आईला वाटतं – “मुलं थोडं बोलावं.”
मुलांना वाटतं – “आई थोडं शांत राहावं.”
बाबांना वाटतं – “घरात शांतता असावी.”
आणि घराला वाटतं – “थोडं हसू येऊ दे!”
छोटा संवाद पुरेसा असतो
कधी फक्त एक “कशी आहेस?”
किंवा “बाबा, चाललंय ना सगळं?”
इतकंही पुरेसं असतं घरातला उबदारपणा परत आणायला.
घरात आपण जास्त बोलायला हवं,
आणि कमी रागवायला.
कारण प्रेमाच्या घरात अपेक्षा shouting ने नाही, sharing ने पूर्ण होतात.
घर म्हणजे एक जिवंत भावना आहे.
इथे सगळे imperfect असतात,
पण नातं perfect असतं – जर आपण थोडं मन मोकळं ठेवलं तर.
अपेक्षा ठेवू शकता,
पण ती अशी ठेवा की घर हलकं वाटावं,
जड नाही.
कारण शेवटी घर म्हणजे
“मी जिथे रागावू शकतो आणि तरीही मला प्रेम मिळतं!”

